गॅस पाईपलाईनने नादुरुस्त झालेला रस्ता पूर्ववत करा

सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब यांच्या ठेकेदाराला सूचना

बांदा/प्रतिनिधी
गॅस पाईपलाईनसाठी बांदा शहरात राष्ट्रीय महामार्गलगत सेवा रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने स्थानिक दुकानदार व व्यापारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी याठिकाणी पाहणी करत रस्त्याचे काम तात्काळ पूर्ववत करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या. ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता रातोरात रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने सरपंच श्रीमती नाईक यांनी ठेकेदाराला खडे बोल सुनाविले.
सरपंच श्रीमती नाईक, उपसरपंच खतीब यांच्यासह शैलेश केसरकर यांनी याठिकाणी येत पाहणी केली. यावेळी हेमंत दाभोलकर, सुधाकर बांदेकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, मिलिंद सावंत, साई तोरसकर, श्री ठाकूर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page