⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर प्राचार्य आनंद बांदेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सण 1978-79 चा अभ्यास मधील विद्यार्थी मित्रांनी आज त्यांच्या निवासस्थाने भेट देत सालसेफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. हा गौरव ज्येष्ठ पुरोहित मित्र अरुण गोगटे यांच्या हस्ते शाल तर श्रद्धा आरेकर व प्रभा तेंडुलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मिठाई देवून करण्यात आला.
यावेळी सण 1978-79 च्या दहावी बॅचमधील त्यांचे वर्गमित्र अरुण गोगटे, मनोज साळगांवकर, जयंत मोंडकर, नितीन कुबल, इरशाद शेख, विकास मौर्य, मारुती धुरी, दीपक कोचरेकर, प्रभा तेंडुलकर, श्रद्धा आरेकर, दीपक आंगचेकर आदींचा समावेश होता.
हे सर्व मित्र कोणतेही कल्पना देता अचानक मोठ्या प्रमाणात त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी केलेल्या सत्काराने प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर भारावून गेले.
