अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश

⚡कणकवली ता.१६-: ओसरगाव टोल नाक्यानजीक पडक्या विहिरीत रेस्क्यू करून अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात सर्प मित्रांना यश आले आहे. या अजगराला नजीकच्या कसाल नदीपात्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ओसरगावतील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध सर्पमित्र रोहित राणे, अक्षय राणे, रोशन तोरस्कर ,महेश मोरये यांच्या साथीने रात्री साडेबारा ते दोन वाजेपर्यंत टोल नाक्यानजीक पडक्या विहिरीत रेस्क्यू करून अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले व नजीकच्या कसाल नदीपात्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्रीच्या वेळी धोकादायक परिस्थितीवर मात करून 30 फूट खोल पडक्या विहिरीत अजगर पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र रोहित राणे यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले व आजूबाजूला टोलनाक्या नजीक वस्ती असल्यामुळे त्याला ताबडतोब बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला व यशस्वी मोहीम राबवण्यात आली.

You cannot copy content of this page