ग्रामस्थांचे वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन
बांदा/प्रतिनिधी
डोंगरपाल गावात विजेचा लपंडाव सुरु असून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील समस्यांचे तातडीने निराकरण करावे अशी मागणीचे निवेदन डोंगरपाल ग्रामस्थांनी महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना दिले.
लवकरात लवकर सर्व समस्यांचे निराकारण न केल्यास स्वातंत्र्यादिनी १५ ऑगस्ट रोजी गावाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
यावेळी धनंजय गवस, नामदेव गवस, दाजी गवस, बाळा गवस, उद्देश गवस, प्रमोद गवस, रवींद्र गवस, महेश नाईक, ज्ञानेश्वर गवस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अभियंता कोहळे यांनी आपण स्वतः पाहणी करून सर्व वीज समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
