रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर दुचाकी अपघातात बांदा येथील युवकाचा जागीच मृत्यू

बांदा ता.१६-: रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे दुचाकीचा अपघात होऊन बांदा शेटकरवाडी येथील युवक गणेश शेटकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी सुमित्रा गणेश शेटकर ही गंभीर जखमी झाली आहे.

तिच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज सकाळी झाला. याबाबतची माहिती साखरपा पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page