⚡कणकवली ता.१५-: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कबड्डीपटू ,खेळाडू, कोच, आणि कबड्डी प्रेमी, या सर्वांच्या सहकार्याने कबड्डी विषयाबाबत चर्चा विचारविनिमय करण्याकरिता या कबड्डीपटू,आणि कबड्डी प्रेमी यांची बैठक मंगळवार, 20 जून 2023 सकाळी 10 वा. तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी तसेच खेळाडूंना शासनाच्या 5% आरक्षित कोट्यातून नोकरी मिळावी, खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे. तसेच खेळाच्या प्रोत्साहनार्थ जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करणे याकरिता कार्यरत असलेल्या शिव छत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र करमळकर,ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
