शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे विविध व्यवसायांकरिता प्रवेश प्रक्रीया सुरु

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट-2023 करिता मंजूर असलेल्या १) Sewing Technology, २) Wood Work Technician, ३) Copa. ४) Draughtsman Civil ५) Mechanic Motor Vehicle, ६) Fitter ७) Turner, ८) Wireman ९) ICTSM या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२ जून २०२३ पासून दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत Online पध्दतीने सुरु करण्यात आली आहे. अर्ज व अर्जाचे Online पध्दतीने भरणा करावे. अशी माहिती प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी यांनी दिली आहे.
Online पध्दतीने वरील अर्ज व शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निश्चितीकरिता (Confirm) घेऊन कार्यालयीन वेळेत हजर रहावे. उमेदवारांचे अर्ज तपासणी करुन अर्ज निश्चित (Confirm) केला जाईल. त्यानंतर उमेदवाराने दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक १२ जुलै २०२३ पर्यंत आपल्या पसंतीनुसार व्यवसायनिहाय/ संस्थानिहाय विकल्प (Trade Option) भरावेत. प्राथमिक गुणवत्ता यादी दिनांक १३ जुलै २०२३ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. ती स्वत:च्या Login मधून आपला गुणवत्ता क्रमांक पाहता येईल. गुणवत्तेबाबत कोणताही आक्षेप / हरकत असल्यास. माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांने आपल्या नजिकच्या आयटीआयमध्ये जाऊन दिनांक १३ ते १४ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्यानंतर बदल करता येणार नाही.
प्रत्येक प्रवेश फेरीच्या आदल्यादिवशी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यांत येईल. फेरीच्या दिनांक आपल्या अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे, झेरॉक्स व शुल्कासह उमेदवारांनी हजर रहावे. पहिली प्रवेश फेरी दिनांक २१ जुलै २०२३ ते २५ जुलै २०२३. दुसरी फेरी १-ऑगस्ट २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३, तिसरी फेरी १० ऑगस्ट २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ व चौथी फेरी २१ ऑगस्ट २०२३ ते २४ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे.
वरील चार प्रवेश फेरीऱ्यानंतर शिल्लक जागांसाठी संस्थास्तरावर समुपदेश फेरीची कार्यवाही दि. २७ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक वरील संकेतस्थळावर जाऊन पहावे. प्रवेशाचे प्रसिध्द करण्यांत आलेले वेळापत्रक हे सूचक दर्शक असून त्यामध्ये बदल संभवतो तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी, (बाहेरचावाडा), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्र. (०२३६३) २७६१३६ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३३०४७३५/९९७५८५४२०१/९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी यांनी कळविले आहे.
०००००

You cannot copy content of this page