विविध उपक्रमांनी मनसेकडून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा…

आशिष सुभेदार यांचा पुढाकार; सोलर लाईटचे लोकापर्ण

⚡सावंतवाडी ता.१४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने विविध उपक्रम करुन साजरा करण्यात आला. माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम राबविण्यात आले.
यात तिरोडा फणसूरेवाडी तसेच आरवली सोनसुरे येथे काशी कल्याणी ब्राह्मण मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण करण्यात आले सदर स्ट्रीट लाईट साठी लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम सूर्यकांत मयेकर यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आला.


दोन्ही स्ट्रीट लाईटचे लोकार्पण प्रमुख गावकऱ्यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच शालेय मुलांना वह्या पेन वाटप व वृक्ष लागवड,वृक्ष वाटप असे विविध कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर सचिव आबा चिपकर सहसचिव मनोज कांबळी निलेश मुळीक मंदार नाईक नंदू परब बाळा पालकर दिलीप पालकर जयवंत गोडकर प्रशांत सावंत मनोहर कोल्हे मयूर पालकर ओमकेश गोडकर गणेश गोडकर अनिकेत मातोंडकर अभिजीत चिपकर गॅब्रियल फूडताडो व चिपकर परिवार ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page