मालवणात १८ रोजी गोल्ड व्हेल्युअर् कार्यशाळा

प्रदेश सुवर्णकाळ संघ आणि मालवण दैवज्ञ हितावर्धक समाजाचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्ड व्हॅल्युअर कार्यशाळा दैवज्ञ भवन मालवण येथे रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी व खरेदी विक्री संघ जि. सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. व्हिक्टर डान्टस हे उपस्थित रहाणार आहेत.

गोल्ड व्हॅल्युअर व ज्वेलर्स क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान, कायदेशीरबाबींचे सखोल ज्ञान, सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा सर्व गोल्ड व्हॅल्युअर व ज्वेलर्स बांधवांच्या विकासासाठी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत श्री. सुधीर पेडणेकर, श्री. महेंद्र सोनी, ऍड. गणेश चव्हाण, श्री. संजय भामरे, श्री. अनिल कारेकर, श्री. शेखर वानखडे, श्री. आदिप वर्णेकर, श्री. नितीन मसुरकर, श्री. अर्जुन काजळे, श्री. नंदकुमार बेलवलकर, श्री. संजय पितळे, श्री. प्रकाश कुबल हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण अध्यक्ष डॉ. विवेक रायकर व सराफ असोसिएशन मालवण अध्यक्ष श्री. अनिल मालवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page