स्वतंत्र नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजूर झाल्याने ग्रामस्थांकडून आनंदोत्सव

नवीन कुर्ली वसाहतीतील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

⚡कणकवली ता.१३-: नवीन कुर्ली ग्रामपंचायत प्रस्ताव मंजूर करून आणण्याचे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय आग्रे व संदेश पटेल यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याने फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत मधील नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि संदेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षात प्रवेश केला.
दरम्यान यावेळी बोलताना नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे कार्यध्यक्ष हरेश पाटील यांनी सांगितले,नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त गावठणाचे पुनर्वसन 1995-96 साली फोंडाघाट-लोरे या माळरानावर करण्यात आले. मात्र तेव्हापासून आपली स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी 27 वर्षे लागली. दरम्यानच्या काळात काही प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली तयार झालेल्या संघटणांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी फक्त आश्वासनावर आश्वासनेच देत आली. त्यात कहर म्हणजे तीन वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांनी विश्वासाने अध्यक्ष बनवलेल्याने तर स्वतंत्र कुर्ली ग्रामपंचायत बनवणे शक्य वाटत नसल्याने चक्क येथील काही घरे लोरे ग्रामपंचायतला नेऊन जोडण्याचा पराक्रम केला मात्र नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी डिसेंबर 2022 च्या ग्रामसभेमध्ये निर्धार केल्याप्रमाणे येथील स्थानिक नेतृत्व आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांच्या सहकार्याने आज आम्ही नवीन कुर्ली ग्रामपंचायत प्रस्ताव मंजूर करून घेत वचन पूर्ती केली याचे समाधान आहे.
नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नवाळे यांनी स्वतंत्र नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी करण्यासाठी दिलेल्या मागील कित्येक वर्षे केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचताना आज मिळालेल्या विजयाचे श्रेय शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर,समृद्धी योजना सदस्य किरण सामंत,आमदार रवींद्र फाटक, स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या सह नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या आणि ग्रामस्थांच्या एकजुटीला दिले आहे तसेच वचना प्रमाणे स्वतंत्र नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजूर करून आणण्यासाठी प्रामुख्याने सहकार्य करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि संदेश पटेल याच्या उपस्थिती आम्ही सर्व ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आता ग्रामपंचायती झाल्यानंतर होणारी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवा.तसेच आपली सर्वांची एकजूट कायम ठेवल्यास आपण सत्तेच्या माध्यमातून या नवीन कुर्लीमध्ये विकास कामांची गंगा आणू शकतो मात्र यासाठी आपल्या एकजुटीची ताकद नेहमी आमच्या पाठीशी ठेवा असे आवाहन यावेळी ग्रामस्थाना केले.
दरम्यान यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख परुळेकर, संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नवाळे, कार्याध्यक्ष हरेश पाटील,पांडुरंग चव्हाण,प्रदीप कामतेकर,एकनाथ चव्हाण,सुनील गोसावी,आनंद सावंत,आशिष पेडणेकर,सत्यवान पवार,सदाशिव चव्हाण, अनंत चव्हाण ,अरुण दळवी, भगवान तेली,बाळकृष्ण चव्हाण,सखाराम हुंबे,संतोष सुद,सुरेंद्र पवार,दिलीप वैराग,प्रवीण पार्टे, चंद्रकांत चव्हाण,राजेंद्र तेली,उत्तम तेली,विजय परब,दाजी सुतार, महेश चव्हाण,शंकर राणे,दीपक शिंदे,काशीराम राणे,अनंत दळवी,शांताराम पार्टे,वासुदेव परब,वसंत येंडे,मधुकर परब जनार्दन पवार,केशव दळवी,अंकुश पोवार अशोक पाटील,शांताराम राणे,प्रमोद पोवार,सुभाष परब यांच्यासह् शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page