बांदा भाजप मंडळाची मोदी @ 9 अभियान कार्यक्रम बैठक संपन्न…

विविध कार्यक्रमाचे नियोजन: प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बांदा ता.१२-: मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.


या बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस दादु कविटकर यांनी केले. यावेळी १४ कार्यक्रमाचे संयोजक निवडण्यात आलेत तसेच प्रत्येक संयोजकाबरोबर दोन सहसंयोजक नेमुन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच बांदा मंडलामध्ये प्रामुख्याने १४ कार्यक्रमापैकी जेष्ठ कार्यकर्ता संमेलन, योग दिन व लाभार्थी मेळावा हे तिन कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच ” संपर्क से समर्थन ” ह्या कार्यक्रमाअंतर्गत जास्तित जास्त प्रभावशाली कुटुंबांशी संपर्क करण्याचे ठरविण्यात आले. भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये लाभार्थी मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले .
यावेळी मार्गदर्शन करताना विधानसभा संयोजक प्रसन्ना देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा, विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. या अभियानात आपल्या विधानसभा मतदारसंघात बुथस्तरावर व्यापक जनसंपर्क, लाभार्थी संपर्क, समाजातील विविध घटकांशी संपर्क, जेष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहीती सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी असे आवाहन केले.
या बैठकीत माजी जिल्हाध्यक्ष शामकांत काणेकर, मंदार कल्याणकर, मंडल अध्यक्ष महेश धुरी, शितल राऊळ, युवा नेते प्रथमेश तेली, माजी सरपंच अशोक सावंत, मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, माजी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंचा प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, युवा मोर्चा जि. उपाध्यक्ष जावेद खतिब, किसान मोर्चाचे अजय सावंत, गुरुनाथ सावंत, डेगवे सरपंच राजन देसाई, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदिप राऊळ, श्रीरंग कांबळी, गुरूनाथ पेडणेकर, शामराव सावंत, नारायण कांबळी, विकास केरकर, प्रशांत बांदेकर, उदय देऊलकर, रत्नाकर आगलावे, राजन देसाई, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, उमेश पेडणेकर, राजाराम धारगळकर, राजाराम सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट यांनी मानले.
फोटो :-
बांदा येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे पदाधिकारी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page