नानोस गावातील विकास कामे तातडीने पूर्ण करा…

सागर नानोस्कर; खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी…

⚡सावंतवाडी ता.१२-: नानोस गावातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नानोस्कर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामध्ये नानोस- तिरोडा ब्रीज दुरुस्त करणे, तीरोडा येथील मंजूर झालेल्या मोबाईल टॉवरचे काम पूर्ण करणे, गणेशघाट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे, तीरोडा दावरेश्र्वर मंदिर ते नानोस रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणे. आदी कामांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page