मुख्यमंत्र्यांच्या नागरिक सत्काराला नागरिक गोळा करावे लागले हे केसरकारांचं दुर्दैव…

प्रवीण भोसले; मुख्यमंत्र्यांचा कालचा कार्यक्रम निराशाजनक…

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे फसवे मंत्री आहेत. त्यांना सावंतवाडीकर जनता ओळखून आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्काराला नागरीक गोळा करून आणण्याची वेळ त्यांच्यावर आली असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लगावला.

दरम्यान आमच्यावेळी पण मुख्यमंत्री आले. आम्ही पण सत्कार केलेत ते फार जूने नाहीत. ते सत्कारानं भारावून गेले होते. परंतु, काल नागरी सत्कार करण्यासाठी नागरीक हे गोळा करावे लागले. हे ऐकून धक्का बसला. एक नागरिक म्हणून वाईट वाटलं. औपचारिक पणा फक्त पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम होतात पण काल ते दिसल नाही. स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे सोबत होते. निराशाजनक असा कार्यक्रम काल झाला. भाजपसोबत असताना आपण आणि आपला फोटोच केसरकर मिरवत होते.

भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा कार्यक्रमात नव्हते. एकला चलो रे, मीच करतो अशा भुमिकेमुळे निराशा झाली. माजी नगरसेवकांना सोबत घेण आवश्यक होत. ते न केल्यानं नागरिक गोळा करायची वेळ केसरकरांवर आली.

केसरकर,लोकांना उपरे, बाहेरचे म्हणतात‌. पत्रात सुद्धा त्यांनी म्हंटले. बाहेरचे कोण आहेत ? असा सवाल प्रविण भोसले यांनी केला. शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे फसवे मंत्री आहेत. त्यांना सावंतवाडीकर जनता ओळखून आहे. त्यामुळेच सावंतवाडीकरांनी कालच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं विधान प्रविण भोसलेंनी केलं.

You cannot copy content of this page