मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करणार जंगी स्वागत…

भाजपा नेते विशाल परब यांची माहीती

⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले जाणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी दिली. शिंदे- फडणवीस सरकारने अवघ्या काही महिन्यातच राज्यामध्ये विकासाची गंगा आणली आहे हीच गंगा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही पाहायला मिळत असून 1990 मध्ये मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाला जी चालना दिली.

होती ते काम पुढे येण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करत आहेत. नजीकच्या गवाराच्या मध्ये झालेला विकास पाहता सिंधुदुर्गातही त्याच धर्तीवर विकास व्हावा ही वर्गातील जनतेची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा विकास सिंधुदुर्ग जिल्ह्यात नक्कीच येईल यात शंका नाही.

You cannot copy content of this page