हनुमंत गडावर उद्या शिवराज्यभिषेक दिन

सह्याद्री प्रतिष्ठान आणि श्री देवी माऊली मंडळाचे आयोजन

⚡बांदा ता.०५-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गडावर मंगळवार दिनांक ६ रोजी भव्य दिव्य राज्यभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ ते ७ या वेळेत पुजन, १० ते ११ या वेळेत वेशभुषा स्पर्धा, ११ ते दुपारी १२.३० पर्यंत शिवव्याख्यान होणार आहे.
त्यानंतर मान्यवरांचे सत्कार सत्कार होणार आहेत. दुपारी १ ते २ या वेळेत गडावर उपस्थित असलेल्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.


अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी निलेश आईर- 9421194430 किंवा चिंटु आईर -98237 33494 यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच शिवप्रेमीनी गडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page