मीरा भाईंदर प्रभाग चारचे होते शिवसेना विभागप्रमुख
बांदा/प्रतिनिधी
शिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४ चे विभागप्रमुख भरत नारायण पंडित (वय ५५, मुळ रा. कास) यांचे हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने बांदा येथे निधन झाले. ते बाजारात आले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी त्यांना मृत घोषित केले.
