मालवणात खास. संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

⚡मालवण ता.०३-: शिवसेना (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह कृती करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आज मालवण भरड नाका येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. यावेळी खास. राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह कृती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरातील भरड नाका येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे व तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्राला जोड्या मारण्यात आल्या. यावेळी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात तालुकाप्रमुख महेश राणे, अरुण तोडणकर, अच्युत लोके, उदय राऊत, नितेश पेडणेकर, कमलेश सारंग, नीलम शिंदे, भारती घारकर, निकिता तोडणकर, बाळू नाटेकर, तात्या बांदेकर, भिवा कोळंबकर, नित्यानंद कांबळी, प्रसाद तोडणकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page