मनीष दळवी:कॉमन सर्विस सेंटर प्रशिक्षण प्रसंगी केले प्रतिपादन
ओरोस ता.०२-:
आपल्या गावातील परिसरात अनेक शेतकरी, विद्यार्थी आहेत. हे सगळे लोक आपल्या विकास संस्थेबरोबर आल्यास विकास संस्थेचे अन्य व्यवहार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक संधी प्राप्त होईल. सगळ्या प्रकारची सेवा जर विकास संस्थेच्या कार्यालयांमध्ये दिली तर त्या गावचं एक विकासाचं केंद्रबिंदू म्हणून आपण विकास संस्थां पुढे आणू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील विकास संस्थाचे चेअरमन व सचिव यांच्यासाठी प्राथमिक शेती सहकारी संस्थांसाठी कॉमन सर्विस सेंटर बाबत प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी मधील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नाबार्ड प्रबंधक अजय थुटे, कॉमन सर्विस सेंटर जिल्हा समन्वयक सुयोग दीक्षित, हर्षद ढेकणे-कॉमन सर्विस सेंटर अधिकारी, सहाय्यक निबंधक अनिलकुमार खंडागळे, के आर धुळप, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक देवेंद्र लोकेगांवकर,संदेश हडकर तसेच जिल्ह्यातील विकास संस्थांचे चेअरमन,सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.
