बदली निमित्त संदीप गोसावी यांचा सत्कार

माजगाव ग्रामपंचायतने केला निरोप समारंभ

⚡सावंतवाडी ता.०२-: येथील माजगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप गोसावी यांची आंबोली येथे बदली झाल्याच्या निमित्ताने त्यांचा आज ग्रामपंचायतच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच डाॅ.सौ. अर्चना सावंत यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी जी.प.अध्यक्ष रेश्मा सावंत, अशोक दळवी, उपसरपंच बाळा वेजरे , अजय सावंत,आबा सावंत, सचिन गावडे, गुरु घाडी इ.उपस्थित होते

You cannot copy content of this page