ओरोस ता.२६-:
भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्यावतीने आम्ही सत्तारूढ झालो असलो तरी आता संचालक व पदाधिकारी म्हणून सर्वांना सोबत घेऊनच पतपेढीचा कारभार अधिक उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे नूतन अध्यक्ष नारायण नाईक यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आज सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीच्या जिल्हा कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अध्यक्षपदी नारायण नाईक तर उपाध्यक्ष पदी संतोष राणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक संतोष मोरे, सीताराम लांबर, मंगेश कांबळी, सचिन बेर्डे, विजय सावंत, श्रीकृष्ण कांबळी, संजय पवार, चद्रसेन पाताडे, महेंद्र पावसकर, ऋतुजा जंगले, समीक्षा परब यांच्यासह प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस तथा पॅनल प्रमुख राजन कोरगावकर, पतपेढी मावळते अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, जिल्हा सचिव सचिन मदने, माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर राणे, अनंत राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
