मालवणच्या भंडारी ज्युनिअर कॉलेजमधून अमोल घाडी प्रथम

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून या ज्युनिअर कॉलेजमधून अमोल वासुदेव घाडी हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी प्रथम आला आहे

भंडारी एज्युकेशन सोसायटीज कनिष्ठ महाविद्यालयातून १२६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्य श्रेणी प्राप्त केली असून २३ जणांनी प्रथम श्रेणी तर ८२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. तृतीय श्रेणीत १४ जण उत्तीर्ण झाले.

यामध्ये कला शाखेतून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १ विद्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणीत, ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम – प्रगती प्रसाद भोगले (४५६), द्वितीय – दिगंबर रामचंद्र सातोसकर (४३२), तृतीय – साक्षी रवींद्र पवार (३८९) यांनी यश मिळविले.

वाणिज्य शाखेतून ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील ६ विद्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणीत, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तृतीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम – अमोल वासुदेव घाडी (५१२), द्वितीय – रिया गणेश गिरकर (५०७), तृतीय – सौरभ नरेश चव्हाण (५०२) यांनी यश मिळविले. तर विज्ञान शाखेतून ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील प्रथम श्रेणीत २, द्वितीय श्रेणीत ३१ तर ४ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम – श्रावणी श्रीराम गावकर (४२३), द्वितीय – कोमल सत्यवान पालव (३६८), तृतीय – प्रेरणा सोमा चव्हाण (३५६) यांनी यश मिळविले.

यशस्वी विध्यार्थ्यांचे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वामन खोत, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर तसेच संस्था पदाधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page