मनसेचा सोलर लाईट लोकार्पण उपक्रम

युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला कार्यक्रम

⚡सावंतवाडी ता.२५-: युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्ह्याध्येक्ष आशिष सुभेदार यांनी वेंगुर्ला तुळस येथील गोवर्धन मंदिर, समीर तेली व जयदेव शिर्सेकर यांनी जांभळ वाडी कासार्डे, सुनील सोनार ख्रिशन स्मशानभूमी कसवण गाव, दत्ताराम बिडवकर बेळणे पूल,कणकवली येथे, राजेश मामलेकर यांनी गुळदेव ब्राम्हण स्थळ, सावंतवाडी येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार करण्यात आले.

वीज दरवाढ व लोड शेडिंगने त्रस्त गावकऱ्यांनी मनसेच्या गणेश कदम यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून गणेश कदम यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page