बोर्ड लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याच्या आरोपातून मुजीब शेख यांची निर्दोष मुक्तता

सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे सावंतवाडी नगरपरिषदेची कायदेशीर पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या जाहिरातीचे दोन बोर्ड लावून आरोपी मुजीब शेख यांनी शहराचे विद्रुपीकरण केल्याचे गुन्ह्यातून सावंतवाडीच्या न्यायदंडाधिकारी साहेब श्रीमती बेडगकर मॅडम यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. बाळाजी बाबुराव रणशूर यांनी काम पाहिले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आरोपी मुजीब शेख, सावंतवाडी यांचे सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथील वसंतप्लाझा इमारतीमध्ये तळमजल्यावर दोन दुकान गाळे आहेत. त्याठिकाणी ते व्हिडीओ गेम चा व्यवसाय करतात. दि. १४/१२/२०१६ पासून ते दिनांक १२/०४/२०१७ या कालावधीत सदर इमारतीच्या मोकळ्या जागेत मुजीब व्हिडीओ गेम पार्लर व प्रायव्हेट गाड्या भाड्याने मिळतील असे दोन मोठे जाहिरातीचे फलक नगरपरिषद सावंतवाडी यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आरोपीने बेकायदेशीरपण लावले होते. अशा प्रकारचे बेकायदेशीरपणे बोर्ड लावून आरोपीने शहराचे विद्रुपीकरण केलेले असे नगरपरिषदेतर्फे पर्यवेक्षक आनंद मोतीराम कदम यांनी दि. २९/०४/२०१७ रोजी आरोपी विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती… सदर फिर्यादिचे अनुषंगाने तपासकाम करुन पोलीसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपनास प्रतिबंध कायदा १९९५ चे कलम ३ प्रमाणे मे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते..

सदरची केस में न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात चालली. आरोपी विरुद्ध आरोप सिद्ध करणेस सरकार पक्षातर्फे फिर्यादी कदम, मुख्याधिकारी द्वासे, अतुल नाखरे, तपासी अंमलदार सुभाष तेली यांचेसह एकूण सात साक्षीदार तपासणेत आले. सदर साक्षीदारांचा उलटतपास घेताना आरोपी तर्फे वकील श्री. रणशूर यांनी वादातीत दोन्ही फलकांबाबत तपासकाम झाले नसलेचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपीने फलक लावल्याबाबतचा कोणताही पुरावा मुख्याधिकारी द्वासे यांचेकडे नसलेचे पण उलटतपासात कोटांसमोर आणले. अॅड. रणशूर यांचा सदरचा उलट तपास व युक्तीवाद ग्राह्य मानून मे. न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

You cannot copy content of this page