बहुजन मुक्ती पार्टीची जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त 19 रोजी सावंतवाडी सभा

⚡बांदा ता.१८-: बहुजना जागा हो, या सत्तेचा धागा हो हे ब्रीदवाक्य घेऊन या सत्तेच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचा चाललेला जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त सावंतवाडी गांधी चौक येथे दि. १९ मे रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी करणार आहेत. इतर मान्यवरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष लाडू जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जी.प. सदस्य मायकल डिसोझा, ज्येष्ठ समाजसेवक काका मांजरेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा प्रभारी सगुण जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र पदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ ओबीसी जनगणना व ईव्हीएम घोटाळा या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या सभेस बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page