आंबोली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ६४ टक्के मतदान

५०१ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

⚡आंबोली, ता.१८-: येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणूक चुरशीने मतदान झाले.७७२ पैकी ५०१ मतदान झाले.६४.९ टक्के मतदान झाले.महिला २५१ आणि २५० मतदान झाले.

या ठिकाणी केंद्रावर निवडणूक अधिकारी,दीपक राऊळ,उदेश नाईक,बापूशेट कोरगावकर,हौसा गवस मॅडम, मंडळ अधिकारी जी आर गुरव,तलाठी प्रवीण पोले, कोतवाल लाडू गावडे, या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक श्री यशवंते, पोलीस नाईक दीपक शिंदे,जयराम लोके,होमगार्ड ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील यांनी व्यवस्थापन पाहिले. मतदान चुरशीने शांततेत झाले.

या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत बुधाजी उर्फ संतोष पाताडे, भाजप पुरस्कृत दीपक नाटलेकर, अपक्ष उमेदवार विलास गावडे हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. दरम्यान उद्या १० वाजता तहसीलदार कार्यालय येथे १० वाजता मतमोजणी होणार आहे.

You cannot copy content of this page