मित्रांसमवेत गेला होता पोहण्यासाठी
देवगड (प्रतिनिधी)
मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेलेला
स्वराज सुनिल पेडणेकर(२१)रा.कुणकेश्वर चांदेलवाडी
हा युवक पोहताना बुडाला.आणि त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी
४.३० वा.सुमारास सापडला.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा मित्रांसमवेत
गुरूवारी दुपारी ३.३० वा.सुमारास मारूती मंदीराखाली
कुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेला
हाेता.चाैघेजण पाेहत असतानाच स्वराज हा
लाटाबराेबर पाण्यात ओढला गेला.मित्रांनी
वाचविण्यासाठीआरडाओरड केली मात्र ग्रामस्थ
घटनास्थळी धावून येईपर्यंत ताे पाण्यात
बुडाला.घटनास्थळी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी
गर्दी केली हाेती.सर्व ग्रामस्थांनी त्याचा शाेध
घेतल्यानंतर तासाभरानंतर त्याचा मृतदेह पाेहत असलेल्या
ठिकाणी पाण्यात सापड;ला.
स्वराज हा देवगड महाविद्यालयात शिकत
हाेता.आई, वडील, आजाेबा, दाेन बहिणी असा परिवार
असून वडील हे आंबा बागायतदार आहेत.स्वराजच्या
दुर्दैवी निधनाने कुणकेश्वर गावात हळहळ व्यक्त हाेत
आहे.याबाबत देवगड; पाेलिस स्थानकात त्याचा मित्र मंदार प्रदीप कुळकर्णी यांनी खबर दिली आहे.देवगड
पाेलिस अधिक तपास करीत आहेत.
