*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती*
*सावंतवाडी-:* येथील जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेली नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा उद्या दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरु होत असुन, या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या सकाळी ९ वाजता होणार आहे. ही स्पर्धा २८ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. तसेच या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण युट्युब द्वारे लाईव्ह केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे.
