राज्य क्रिकेट स्पर्धेच्या जिल्हा संघात एम् क्रिकेट अकादमीच्या ८ खेळाडूंचा समावेश

१६ वर्षाखालील स्पर्धा उद्यापासून होणार सुरू

⚡सावंतवाडी ता.१४-: महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील १५ मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ जणांच्या संघात एम् क्रिकेट अकादमी सावंतवाडीच्या ८ खेळाडूंचा समावेश आहे.

यात साजिल खतीब, ईशांत कुबडे, अथर्व तोरस्कर, रुद्रेश कर्णिक, मंथन नाईक, आर्यन दुधवडकर, पार्थ नर, साहिल नाटलेकर यांचा समावेश आहे. राहुल रेगे, नील रेगे व अविनाश जाधव यांचे या खेळाडूंना प्रशिक्षण लाभले आहे.

You cannot copy content of this page