खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते

तहसीलदार स्वाती देसाई यांचे प्रतिपादन

⚡देवगड ता.१४-: खेळ कोणताही असो खेळ खेळल्यामुळे शारीरिक विकास शकतो व मानसिकता प्रबळ बनते खेळ ही एक शारीरिक कला आहेस किमान अर्धा ते एक तास केले पाहिजे खेळामुळे चपळता वाढते आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात आणि त्यासोबतच आपला व्यक्तिमत्व विकास घडतो खेळ हा शालेय जीवनासाठी महत्त्वाचा भाग आहे खेळामुळे मानसिक स्वास्थ लागते असे प्रतिपादन तहसीलदार स्वाती देसाई यांनी त्याला सोडताना मुंबई क्लब च्या वतीने आयोजित वार्षिक कला क्रीडा पारितोषिक समारंभाच्या वेळी बोलताना व्यक्त केले.

सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागातील शालेय गटापासून खुल्या गटातील मुले आणि महिलांच्या विविध स्पर्धा दिनांक ११ व १२ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शिवप्रतिमा पूजन अध्यक्षातथा अप्पर आयुक्त मुंबई मनीषा सतीश धुरत यांनी केले. त्यानंतर धावणे, उलट चालणे,स्लो सायकल,पोहणे, गोणता उडी,फुगा फोडणे,या स्पर्धेला प्रारंभ झाला.


: देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी तारा स्पोर्ट्सचे कार्य कौतुकास्पद असून देवगडचा कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षे झाली एकही गुन्हा नसलेले गाव असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले कार्यकर्त्यांनी गावाला या माध्यमातून दिशा देण्याचे काम उत्तम प्रकारे करण्याची सूचित करून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावे आणि तालुक्या सोबतच आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले प्रमोद कांदळगा वकर यांनी आज सर्वत्र क्रीडा स्पर्धा होत असून तारा स्पोर्ट्सचे खेळाडू यात फार पुढे आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार याच गावातील वीणा खवळे शेलटकर यांनी प्राप्त केल्याची आठवणी त्यांनी या निमित्ताने करून दिली.तारा स्पोर्ट्स तारामुंबरी गेली वर्षे कार्यरत आहे यावेळी तारा स्पोर्ट्स विजयी व उपविजयी खेळाडूंचा सन्मान तहसीलदार स्वाती देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, प्रमोद कांदळगावकर, विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त सूर्यकांत जोशी मान्यवरांचे हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले ३५ वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा सतीश धुरत यांनी घेतला स्थानिक महिलांनी मिशन सात पंचेचाळीस ही एकांकिका सादर करून मोबाईलचा अतिवरेक कसा चालला आहे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खूप सुंदर केला आणि वाहवा मिळावी दिनांक १२मे रोजी सेवानिवृत्त भारतीय फौजी चंद्रशेखर खवळे यांच्या हस्ते स्पर्धा विजेत्या मुलांना आणि मैदाना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावी याचा मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि विजय हरम लिखित दिग्दर्शित सामाजिक एकांकिका सादर करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष देविदास परब सचिव जागृत जोशी,कोशाध्यक्ष नितीन चोपडेकर इतर सदस्य उपस्थित होते. तारा स्पोर्ट्स क्लब कार्यकर्त्यांनी दोन दिवसीय महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page