सावंतवाडी ता.१४-:
कर्नाटक मधील काँग्रेस पक्षाचे निर्विवादपणे १३६ आमदार निवडून येऊन एक हाती सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी चौक सावंतवाडी येथे विजय जल्लोष फटाके फोडून व राहुल गांधी तुम आगे बढो अशा घोषणा देत पेढे वाटून साजरा करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर, विभावरी सुखी, रवींद्र म्हापसेकर ,शहर अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, अभय मालवणकर, रुपेश आईर , संजय लाड, समीर वंजारी, आनंद कुंभार, माया चिटणीस, समीर भाट, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस जास्मिन लक्ष्मेश्वर , उल्का सांगेलकर, कौस्तुभ पेडणेकर, संदीप सावंत, संतोष कासकर ,अशोक राऊळ , बाळा नमशी ,स्मिता वाघळे ,संतोष मडगावकर अरुण नाईक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
