गेली अनेक वर्षाची मागणी; ग्रामस्थामधून समाधान व्यक्त..
बांदा/प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या विलवडे वरचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन येथील प्रमुख मानकरी बाबुराव दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्य रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक ८० ह्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पहिल्या टप्यात १० लाख रुपये जिल्हा नियोजन मधून मंजूर झाले आहेत. टप्पा दोन मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यातून ह्याच रस्त्यासाठी ३५ लाख रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. पुढच्या कालावधी मध्ये रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. येत्या काळात विलवडे गावातील एकही रस्ता मातीचा ठेवायचा नाही व गावाचा सर्वांगिण विकास साधण्याचे लक्ष्य समोर ठेवलय असेही यावेळी श्री गावडे यांनी सांगितले.
यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, वरचीवाडी येथील मानकरी बाबुराव दळवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, परेश दळवी, अपर्णा दळवी, सानिका दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी, संतोष दळवी, विनायक सावंत, अशोक सावंत, राजन दळवी, परेश धर्णे तसेच विलवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
विलवडे वरचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन करताना बाबुराव दळवी. सोबत संदिप गावडे, प्रकाश दळवी व अन्य मान्यवर.
