तीलारीच्या कालव्यात वृद्धाचा मृतदेह

दोडामार्ग सुरुचिवाडी येथील घटना

दोडामार्ग ता.१४-: दोडामार्ग शहरातील वरची धाटवाडी येथे राहत असलेले सुरेश केशव गवस ( वय 73 ) हे शहरातून गोवा दिशेने गेलेल्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आले. मूळ पिकुळे येथील असलेले श्री. गवस हे अलीकडेच दोडामार्गात स्थिरावले होते. आज सकाळी ते मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. बराचा वेळ झाला तरी ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली.

तेव्हा ते कालव्यातील पाण्यात सापडून आले. दोडामार्ग पोलिसांना याबाबतची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी गवस यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

( कालवा परिसरातील कामे नेमकी कधी पूर्ण होणार – चेतन चव्हाण )
तिलारी प्रकल्पाच्या या कालव्यानजीकची अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असून संबधित अधिकारी व ठेकेदार यांचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे. कालवा मार्गावरून ये – जा करणाऱ्यांना या अपूर्ण अवस्थेतील कामाचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. लाखो – कोटी रुपयांची कामे मिळवायची व ती अपूर्ण अवस्थेत ठेवायची असाच खटाटोप ठेकेदार व अधिकऱ्यांनी सुरू ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वी तरी ही कामे पूर्णत्वास येतील अशा अपेक्षा आपण बाळगत असल्याचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी बोलताना स्पष्ट केले.

फोटो –
1 – दोडामार्ग शहरातून गोव्याकडे प्रवाहित झालेल्या डाव्या कालव्यात आढळलेल्या मृतदेहाची पाहणी करताना पोलीस व नागरिक

You cannot copy content of this page