निरवडे येथे डंपर अपघातात दुचाकी वरील दोन युवतीसह एक युवक गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी ता.१२-: डंपरने धडक दिल्याने दुचाकी वरील दोन युवतीसह एक युवक गंभीर जखमी झाला हा अपघात सावंतवाडी शिरोडा मार्गावर आठ वाजण्याच्या सुमारास निरवडे झर बाजार येथे घडला. सदरचे जखमी युवक युवती आरोस येथील असून त्यांना ग्रामस्थांनी उपचाराकरिता निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

दरम्यान अपघातानंतर पळून गेलेल्या डंपरला मळेवाड येथे पकडण्यात आले सदर डंपरची समोरील हेडलाईट बंद होती तसेच एकच लाईट सुरू असल्याने हा अपघात घडला अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

You cannot copy content of this page