हिरण्यकेशी नदीतील गाळ काढण्यात यावा…

प्रकाश गुरव; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

⚡आंबोली,ता.१०-: येथील नदी पावसाळ्यात गाळाने भरल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे शिवाय इतर गोष्टीला ही पाणी वापरायला मिळत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन हिरण्यकेशी नदीपात्रातील गावठण आणि जाधववाडी(रमाईनगर) येथील गाळ काढण्याची तात्काळ आवश्यकता आहे.या ठिकाणची नदी पूर्वी खोल होती.उन्हाळ्यात आंघोळ तसेच इतर कामे मासे देखील मारायचे मात्र सध्या खडखडाट झाला आहे त्यामुळे याची प्रशासन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश देऊन गाळ काढावा पालकमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव यांनी केली आहे.

दरम्यान पावसाळ्यात देखील गाळ साचल्यामुळे पुराचे पाणी घरात घुसते त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page