⚡मालवण ता.०७-: मालवण येथील जि. प. शाळा दांडी या प्रशालेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३ संपन्न झाला. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना अंक ओळख, अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलांना वाचन लेखन करताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात मुलांना पुष्प देऊन व मुकुट घालुन स्वागत करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी सदस्य दिनकर शेलटकर यांनी दीप प्रज्वलन करुन केले. मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण, पदवीधर शिक्षक शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकुर, रामदास तांबे, अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर, सौ.कांचन परब, सौ.मनिषा बाणावलीकर, जेनी मॅडम, सौ.रेवंडकर, सौ.सारंग व माता पालक यांच्या शुभहस्ते पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित पालकांना शिवराज सावंत, सौ. मनीषा ठाकुर यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रामदास तांबे यांनी केले. मेळाव्याला दांडी शाळा पालक व दांडी ग्रामस्थ उपस्थित होते.
