बांदा केंद्र शाळेत लोकराजा शाहू महाराजांना वंदन

⚡बांदा ता.०७-: सामाजिक समतेचा आग्रह धरत आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या १०१व्या पुण्यतिथी शनिवारी बांदा केंद्र शाळेत अभिवादन करण्यात आले.

१००सेकंद नि:शब्द राहत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी
मानवंदना देत लोकराजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाला गतवर्षी ६मेला सुरुवात झाली होती.शनिवारी या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप झाला. यावेळी कनिष्का राजन केणी हिने शाळेसाठी शाहू महाराज यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. या दिवशी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी शिक्षकांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला.

You cannot copy content of this page