रखडलेल्या पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेसाठी अखेर निधी मंजूर…

बबन साळगावकर यांची माहिती; निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार

⚡सावंतवाडी ता.०३-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी मंजूर केला असून अशाच पालकमंत्र्यांची जिल्ह्याला गरज होती अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडी नगरपालिकेच्या कुणकेरी पाळणेकोंड धरणावर नळ पाणी योजना उभारण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न झाले होते 2018 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात यासाठी प्रयत्न झाले होते शासनाच्या तांत्रिक मंजुरीसाठी त्यावेळी तब्बल 46 लाख रुपये वर्ण करण्यात आले होते मात्र अंतिम मंजुरी व आवश्यक असलेल्या निधीच्या मंजुरी अभावी ही योजना गेले काही वर्ष रखडले होते सावंतवाडी शहरातील पाण्याचा प्रश्न लक्षात घेता ही योजना शहरासाठी महत्त्वपूर्ण होती. सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून संजीव परब यांनीही यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आवश्यक असलेली तांत्रिक मंजुरी मिळवण्यास साठी त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. राज्यात अलीकडे झालेल्या सत्ता बदलानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे नगराध्यक्ष श्री साळगावकर यांनी पाठपुरावा केला होता घरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही योजना आवश्यक असल्याबाबत त्यांनी त्यात म्हटले होते नंतर अवघ्या तीन महिन्यातच पालकमंत्री श्री चव्हाण यांनी यासाठी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून तब्बल 56 कोटी 17 लाख रुपये मंजूर केले.
या संदर्भात माहिती देताना श्री साळगावकर म्हणाले. योजना शहरात व्हावी यासाठी आपल्या कार्यकाळात प्रयत्न झाले होते त्यावेळी तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पैसेही भरणा करण्यात आले होते मात्र निधी अभावी ही योजना रखडली होती आता निधी प्राप्त आल्याने ही योजना प्रत्यक्ष रुपी शहरात राबवली जाणार आहे अवघ्या तीन महिन्यात निधी मंजूर केलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चव्हाण यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो अशाच पालकमंत्र्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज होती. या नळ पाणी योजनेमध्ये शहरात चार ठिकाणी उंच टाक्या उभारल्या जाणार आहेत तसेच संपूर्ण पाईपलाईन नव्याने बसवली जाणार आहे प्रत्येक ग्राहकांच्या नळापर्यंत पाईपलाईन बदलली जाणार असून शहरात 24 तास पाणीपुरवठा होणार आहे वॉटर फिल्टरेशन प्लांट सुद्धा यामध्ये होणार आहे गेले कित्येक वर्ष सावंतवाडी शहरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिळणार आहे आपण लवकरच या योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री श्री चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धन्यवाद व्यक्त करणार आहे.

You cannot copy content of this page