⚡बांदा ता.०३-: बांदा निमजगा येथे समाजकल्याण विभागाच्या निधीतून मंजूर झालेल्या गटाराच्या कामाचा शुभारंभ आज ज्येष्ठ नागरिक सुधाकर बांदेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच अशोक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सांवत, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, गुरु सावंत, राजन बांदेकर, सुनिल धामापूरकर, अमोल भाईप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गटाराचे काम सुरु करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
