दुसरीतील नुपूर हीच्याहस्ते ध्वजारोहण

रानबांबुळी सरपंच परशुराम परब यांनी केला आगळावेगळा सन्मान

ओरोस ता.०३-:

विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे.
इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिने क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा मधून प्रत्येक वेळी नंबर मिळवून शिक्षक व गावातील नागरिकाच्या मनात ठसा उमटविला आहे. तिचा सन्मान म्हणून गावचे सरपंच परशुराम परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर यांनी महारष्ट्र दिनी ग्रामपचात येथे आयोजित ध्वजारोहनाचा कार्यक्रम नुपूरच्या हस्ते केला. रानबांबुळी ग्राम पंचायतीच्या या सनमानामुळे नुपूर हिचे सगळीकडे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page