डाॅ.जयेंद्र परुळेकर; प्रकल्प पाहीजेत पण विनाशकारी नको..
⚡सावंतवाडी ता.३०-: सौदी अरेबिया सारख्या देशातील अरामको कंपनीचे सगळं ऐकण्यापेक्षा कोकणातील बहुसंख्य हिंदू जनतेची विनंतीवजा मागणी केंद्र आणि राज्यातील सरकार ने ऐकून बारसू येथे आयटी पार्क आणा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
तसेच कोकणी माणूस प्रकल्प विरोधी म्हणून काही जण करत असलेले वातावरण निर्मिती चुकीची असल्याचेही डाॅ. परुळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
डाॅ. परुळेकर म्हणाले, रिफायनरी या प्रकल्पा विरोधातील प्रखर आंदोलनामुळे कोकणच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं आहे. मात्र काहीजण “येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला कोकणात विरोधच होतो, कोकणी माणसंही विकास विरोधी आहेत” वगैरे चुकीच्या चर्चा समाज माध्यमांमध्ये पसरवत आहेत. पण कोकणातील जनतेला विकास प्रकल्पं हवे आहेत पण विनाशकारी प्रदुषणकारी प्रकल्पं नकोत. त्यामुळे नको ती दुषणे लावली जाऊ नयेत, अशी भुमिका डाॅ. परुळेकर यांनी मांडली आहे.
