रोट रँक्ट क्लब ऑफ रायाझिंग आणि रोटरी क्लबचा उपक्रम
बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे आनंदआश्रय अणाव येथे वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांना महिन्याभरासाठी लागत असलेली औषधे व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी रोटरॅक्टच्या सदस्यांनी आश्रमाविषयी माहिती व आश्रमाची दिनचर्या जाणून घेतली. भविष्यात भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार गार्गी विर्नोडकर, मुईन खान, साईस्वरूप देसाई, अमित धोंगडे, अक्षय कोकाटे आदी उपस्थित होते.
फोटो :-
अणाव येथे वृद्धाश्रमात मदत कार्यावेळी उपस्थित असलेले रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे पदाधिकारी.
