वीज चोरी प्रकरणी तिघांना ३१ लाखाचा दंड

चौके, नांदरुख येथील ग्राहकांचा समावेश;अभियंता ज्ञानोबा बनगर यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी

चौके आणि नांदरुख गावात गेले वर्ष दीड वर्ष विजेच्या मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या तीन वीज ग्राहकांवर सुमारे तीस लाख ९९ हजार रुपयाचा वीज वितरण कंपनीने दंड आकारला आहे. स्मार्ट वीज मिटरमुळे ही वीज चोरी उघडकीस आल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाचे प्रमुख उपकार्यकारी अभियंता ज्ञानोबा बनगर यांनी दिली.

मालवण तालुक्यातील चौके आणि नांदरुख येथे चिरेखानी असून त्यातील दोघांनी स्मार्ट वीज मिटरमध्ये छेडछाड करून गेले वर्ष दीड वर्ष वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका वीज ग्राहकाने विजेची चोरी करताना दोन मिटरमध्ये एम डास सिस्टीममध्ये छेडछाड करत वर्षभर वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. तर नांदरुख येथील एकाने अशाचपद्धतीने वीज मिटरमध्ये छेडछाड करीत वीज चोरली आहे याबाबतची माहिती महावितरणचे सिंधुदुर्ग भरारी पथकाचे प्रमुख उपकार्यकारी अभियंता ज्ञानोबा बनगर यांनी दिली आहे. वीज चोरी करताना सापडून आलेल्या तीन चिरेखाण व्यावसायिकांवर १४ लाख ६१ हजार, ५ लाख ५० हजार, १० लाख ८८ हजार अशी एकूण ३० लाख ९९ रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात महावितरण सिंधुदुर्ग भरारी पथकामधील ज्ञानोबा बनगर सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी विक्रम साव, वरिष्ठ तंत्रज्ञ गुरूदास गुरूदास सावंत, मालवणच्या सहाय्यक अभियंता सोनाली गिरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page