मिशन आधार तर्फे मालवणात पशु- पक्ष्यांसाठी ठेवली पाण्याची भांडी

⚡मालवण ता.२५-: सध्या उन्हाळ्यात वाढता उष्मा आणि पाण्याच्या कमतरेमुळे पशु पक्षी, जनावरे यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पशु पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मिशन आधार सिंधुदुर्गतर्फे मिशन जीवन अंतर्गत मालवणात विविध ठिकाणी पशु पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

या उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ओरोस येथे करण्यात आली. यावेळी मिशन आधारचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मालवणमधील अरूण भोजनालय, माघी गणेश मंदिर, आडारी गणेश मंदिर, खैदा कातवड, ओझर, आनंदव्हाळ, दर्यासागर रिसॉर्ट येथे रमेश मयेकर, मोहन वराडकर, सौ. स्मृती कांदळगावकर यांच्या हस्ते पाण्याची भांडी ठेवण्यात आली. यावेळी मिशन आधार सिंधुदुर्गचे अध्यक्ष सम्राट कुडतरकर, सदस्य अंकिता मयेकर, वामन सावंत, दिपक पाटील, वैभव घाग, मनस्वी कदम आदि उपस्थित होते. मिशनचे अध्यक्ष सम्राट कुडतरकर यांनी अशी भांडी आढळल्यास त्यात पाणी ओतावे, शिवाय आपल्या घराच्या बाहेर अशाप्रकारचे एक भांडे ठेवावे त्यामुळे पशु, पक्षी, जनावरे यांना उन्हामध्ये पाणी उपलब्ध होईल, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page