हवाई पाहणी वरून बबन साळगावकर यांचा खोचक प्रश्न;पालकमंत्री चव्हाण यांनी चौकशी करण्याचीही केली मागणी
⚡सावंतवाडी ता.२५-: आंबोलीतील पर्यटन विकास महामंडळाचा सुमारे 25 कोटी रुपयांचा प्रकल्प हवाई पाहणी करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही का असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान आंबोलीचे प्राईम लोकेशन वरती 17 वर्ष पूर्वी उभा राहिलेल्या पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प अद्याप उद्घाटना विना सडत पडलेला आहे. याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. अधिकारी डोळ्याला झापडे लावून गप्प बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पावर भेट देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी साळगावकर यांनी यावेळी केली आहे.
