जगभरात सिंधुदुर्गसारखे नैसर्गिक सौन्दर्य कुठेही नाही

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर : भोगवेचा स्वच्छ समुद्र किनारा आपल्या आवडीचा

⚡सावंतवाडी ता.२४ प्रसन्न गोंदावळे-: क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात भ्रमंती केली, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखे नैसर्गिक सौन्दर्य अन्य कुठेही नाही. भोगवेचा स्वच्छ समुद्र किनारा हा आपल्या आवडीचा असून याठिकाणी फिरण्याचा आनंद आपण नेहमीच घेत असतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्याशी माझी नाळ जुळल्याने याठिकाणी वाढदिवस साजरा करायला मिळणे हे आपले भाग्य आहे अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ग्लोबल महाराष्ट्रशी बोलताना दिली.

सचिनने सहकुटुंब व नातेवाईक यांच्या समवेत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

You cannot copy content of this page