क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाने पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या चित्रकला स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चालूवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात न घेता ऑनलाईन घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज कै. शिवाजीराव भिसे (सर) यांचा जयंती दिवस असल्याने आज स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक आणि सर्वांना आकर्षित प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-प्रतीक प्रदीप देसाई प्रथम, ऋग्वेद राजन जाधव द्वितीय, हार्दिक अनिल वरक तृतीय, तर स्वरा वैभव तानावडे, अवनी रामकृष्ण बावकर, अभिराज एकनाथ सावंत, आफरीन फर्नांडिस, पृथ्वीराज अण्णासो बाबर, तनिष्क प्रवीण सानप, भार्गवी बाबूलाल यादव, वेलंकणी गोम्स, स्वरा अभय वाटवे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण बांदेकर आर्ट कॉलेजचे सुयोग सूर्यकांत वेटे, अनिल भिसे रत्नाकर माळी, गणेश हरमलकर यांनी केले.
