नाशिक येथील १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीतील ‘एम्स अकॅडमी’ संघ उपविजेता

*सभापती उदय नाईक यांनी सुरू केलेल्या अकॅडमी मध्ये सर्व खेळाडूंनी घेतले होते प्रशिक्षण

*💫सावंतवाडी दि.२०-:* नाशिक येथे पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ‘एम्स ॲकॅडमी’ संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती उदय नाईक यांचे सुपुत्र मंथन नाईक व त्याच्या टीमने उत्कृष्ट अशी खेळी साकारत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे या संघातील सर्व खेळाडूंनी सभापती उदय नाईक यांनी सुरू केलेल्या ॲकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले होते. उदय नाईक यांनी सुरू केलेल्या अकॅडमी मुळे चांगले खेळाडू घडत असून, मोठ मोठ्या स्पर्धेत ते चांगली कामगिरी करत आहेत.

You cannot copy content of this page