उद्या डॉ आंबेडकर यांचा जयंती उत्सव होणार साजरा

तालुका बौद्ध सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळाचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शुक्रवार दिनांक १४ एप्रिल रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी ११ वा.धम्मध्वज रोहन व पूजापाठ ११.३०वा. भव्य अभिवादन रॕली काढण्यात येणार आहे. अभिवादन सभा, स्नेहभोजन समारोप असे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. असे आवाहन संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, सचिव रविंद्र पवार, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page