सांगुळवाडी शाळा येथे उभारण्यात आलेल्या सभागृहाचे शनिवारी उद्घाटन

वैभववाडी प्रतिनिधी
      जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी येथे उभारण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे उद्घाटन वास्तांतरण सोहळा शनिवार दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
     जि प पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नंबर १ येथील इमारत क्रमांक दोन ची दुरुस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या विनंतीनुसार सांगुवाडी बौद्धवाडी येथील ग्रामस्थ तथा शाळेचे माजी विद्यार्थी निवृत्त नायक तहसीलदार भास्कर भिकाजी जाधव सौ. आशालाता भिकाजी जाधव, कार्यकारी अभियंता मुंबई महानगरपालिका संजय जाधव,रवींद्र जाधव, उपसरपंच प्रा. राहुल जाधव आणि कुटुंबीयांच्या योगदानातून शाळेच्या शैक्षणिक उठाव योजनेद्वारे पहिल्या मजल्यावर एक अध्यायावत व सुसज्ज सभागृह तयार करण्यात आले आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगुळवाडी सरपंच सौ पूजा रावराणे ,उद्घाटन  निवृत्त शिक्षिका सुनंदा रावराणे, रा.वि. पाटील निवृत्त उपशिक्षणाधिकारी कोल्हापूर पी.टी. पाटील, निवृत्त मुख्याध्यापक मिलिंद सर्पे यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुस्ताक शेख, गटविसकास अधिकारी जयप्रकाश परब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आणणे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे , लेखक चंद्रकांत जाधव, उद्योजिका सीमा संजय रावराणे, सुशांत रावराणे,प्रथमेश रावराणे, अरविंदराव रावराणे,प्रभानंद रावराणे, रामचंद्र जाधव केंद्रप्रमुख ,जयंत रावराणे, गौतम जाधव यशवंतराव रावराणे, रामचंद्र अडूळकर, उदय दिनदयाळ,  अॕड वामनराव जाधव, सूर्यकांत भोसले, संदीप पाटील, संजय रावराणे ,शरदचंद्र रावराणे, चंदन जाधव, किशोर रावराणे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती सांगुळवाडी व  सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ व  भास्कर जाधव कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page