१७ ते १९ एप्रिलला होणार कार्यक्रम;
कोकीसरे कुंभार समाजाचे आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी
कोकिसरे कुंभार समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 17 एप्रिल ते बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 दरम्यान श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा कोकिसरे येथे आयोजित करण्यात आला आहे .
यानिमित्त विविध धर्मिक, व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.काकड आरती, अभिषेक, दिंडी सोहळा,महाआरती, हरिपाठ, किर्तन, भजन, महाप्रसाद ,महिलांसाठी हळदीकुंकू ,वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंडळाच्यावतीने अध्यक्ष अरविंद जांभवडेकर, मोहन पोर्लेकर, सचिव राजकुमार खेडेकर, संदीप जांभवडेकर यांनी केले आहे.
